संपूर्ण सृष्टी (क्षेत्र) आणि परमात्मा (क्षेत्रज्ञ) याचे विवेचन केल्यावर, श्रीमान या जगातल्या तीन गुणांचे म्हणजेच सत्व, रज आणि तम यांचे ज्ञान अर्जुनाला देतात. ते म्हणतात,
"या तीनही गुणांचे ज्ञान ज्यांना प्राप्त झाले ते गुणी ऋषीजन माझ्याकडे आले. अश्या ’ब्रह्मीभूत’ झालेल्या जनांत जन्म, मृत्यू, सुख, दु:ख यापैकी काहीच नाही." भगवान पुढे म्हणतात,
"सत्व हा शुद्धतेचा, शुभ्रतेचा, तसेच प्रकाशाचा गुण. या सृष्टीत जे काही धवल आहे ते सत्वगुणाचेच एक रूप आहे. सत्वगुण धारण करणारा मनुष्य मृत्यू नंतर स्वर्गात जातो."
"रजोगुण हा आसक्तीचा, असमाधानीपणा असलेला गुण आहे. अश्या व्यक्तींची आसक्ती त्याना कधीच स्वस्थ बसून देत नाही. तो काहीनाकाही मिळवण्यासाठी सतत धडपडत असतो. असा मनुष्य पृथ्वी तलावर सतत जन्म घेत राहतो, आणि त्यामुळेच मोक्ष प्राप्तीपासून कायम दूर राहतो."
"तिसरा तमोगुण, हा मात्र सत्वगुणाच्या विरुद्ध असा गुण आहे. जिथे जिथे अंधार, अज्ञान आहे, तिथे हा तमोगुण आहे. शरीराचा आणि मनाचा मंदपणा म्हणजे तमोगुण असण्याचे संकेत समजावेत. हे लोक कुठल्याही गोष्टिसाठी थोडाफ़ार प्रयत्नही करत नाहीत."
"सत्वगुणी स्वर्गात, रजोगुणी पुन:पुन्हा भूतलावर आणि तमोगुणी सतत अधोगती होउन पाताळात म्हणजेच नरकात जातात. परंतु जो अनन्यभक्तीने माझ्यावर भक्ती करतो, सुख व दु:ख यांचा त्याग करतो, ’सोने रुपे आमुच्या काय कामाचे’ अशी ज्याची वागणूक असेल तो या तीनही गुणांना पार लरून माझ्यामध्ये सामील होतो म्हणजेच त्याला मोक्ष प्राप्ती होते, असं आश्वासन भगवंत पार्थास देतात.

No comments:
Post a Comment