पुरुषोत्तम योग
सत्व, रज, तम या सृष्टीला घडवणार्या तीन गुणांचे विवेचन केल्यावर भगवंत अर्जुनाला संसारवृक्षाचे स्वरूप सांगतात. ते म्हणतात, "वरच्या बाजूला मुळं आणि खाली फ़ांद्या असा हा अतिविशाल आणि अजब असा अश्वत्थ- वृक्ष. वर असलेले हे मूळ म्हणजे मी तर खाली पसरलेल्या या अगणीत फ़ांद्या म्हणजे हा संसार."
हा सगळा फ़ांद्यारुपी संसार सातवा, राज आणि तम या गुणांच्या तणावानेच वाढल्या आहेत. वेगवेगळ्या विषयांचे अंकुर त्याला फ़ुटले आहेत. वेगवेगळे वेद ही या संसारवृक्षाची पानेच. त्यामुळे जो वेद जाणतो तो वेदमुर्ती.
"अश्या या विशाल अश्वत्थाची, वटवृक्षाची सुरुवात कुठे होते किंवा शेवट कुठे होतो हे कुणालाच माहित नाही. हे सगळं प्रचंड गुंतागुंतीचे आहे. सामान्य माणूस यात गुरफ़टून आणि हरवून जातो. यात गुरफ़टून न जाण्याचा एकच मार्ग - वैराग्य. अश्या या वृक्षास तोडायला वैराग्यरुपी कुर्हाडच उपयोगी पडते. अश्या शस्त्राच्या सहाय्याने हा प्रचंड संसाराचा वृक्ष तोडून मनुष्याने परमात्मा प्राप्तीची वाट धरायलाच पाहिजे. खोटी प्रतिष्ठा, मान, अपमान, सुख, दु:ख अश्या खूप वाढलेल्या फ़ान्द्यातून मार्ग काढतच मनुष्य पुरुषोत्तम पदाला पोहोचतो.
त्या पदाचे वर्णन भगवान करतात, त्या स्थानी ना सूर्य, ना चंद्र आणि ना अग्नी प्रकाशितो. शिवाय तिथे पोहोचलेला कोणीही परत येत नाही.
भगवंत पुढे म्हणतात, "शरीरात वास करणारा आत्मा, हा पाच इंद्रिये आणि मन असे धारण करून राहतो, तो आत्मा माझाच अंश. शरीराला सोडून जाताना अज्ञानी माणसाला तो दिसत नाही, ज्ञानी माणसाला मात्र ते स्पष्ट दिसतं. जसा आत्मा माझा अंश त्याच प्रकारे मी जठराचा अंश धारण करून खाद्य, पेय, चोष्य आणि निलेष्य अश्या चारही प्रकारच्या अन्नाचे पचन करतो. मीच सगळ्यांच्या ह्रदयात वास करतो. वेदांचा कर्ता मी, वेदांचं ज्ञान मी आणि वेदांचा ज्ञाता ही मीच आहे."
ते पुढे म्हणतात, "माझं हे खरं स्वरूप जो जाणतो, तो माझीच उपासना करत असतो, तो पुरुषोत्तम मीच आणि माझी अशी उपासना करणारा साधक मलाच येवून मिळतो."

No comments:
Post a Comment