विश्वरुपाचे दर्शन घेतल्यावर अर्जुन असाधारण भावनेने भगवंताना शरण येतो. भगवंत पुन्हा एकदा परतत्वाच्या गुढतेवर उपदेश करू लागतात.
"शरीर म्हणजे अखिल स्रुष्टी असे हे क्षेत्र; आणि या क्षेत्राला जाणणारा क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा होय."
सगळे गुण व अवगुण हे या क्षेत्राचे असतात ( म्हणजेच वर सांगितल्याप्रमाणे शरीररुपी चराचर सृष्टीचे). त्याचबरोबर ज्या रीतीने भास्कर सगळ्या सृष्टीला उजळून टाकतो, तसच क्षेत्रज्ञ हा या संपूर्ण क्षेत्राला उजळून टाकतो.
परतत्वाचे गूढ असे रहस्य भगवंत पुढे मांडतात. शुद्ध ज्ञानाची उकल करताना ते म्हणतात "अनासक्तपणे, मनाचा तोल राखून, अनन्य भावनेने केले ही खरी भक्ती होय. तर 'मी' हे ध्येय आहे, हे जाणून घेवून जे ज्ञान मिळते ते शुद्ध ज्ञान होय. असे ज्ञान असणारा, उत्पत्ती, स्थिती, लय, परिस्थिती याना सगुणत्व प्राप्त करून देवून खरा ज्ञानी होतो."

No comments:
Post a Comment