प्रस्तावना
तुम्हाला सांगतो सध्याचे आयुष्य एवढं स्पर्धात्मक, ताणतणावाचे आणि वैफल्याचे झाले आहे कि विचारू नका. मला त्यामुळे वाटले कि महाराष्ट्राची जी थोर संत परंपरा आपल्या सर्वाना लाभली आणि ज्यांनी त्यांचे अमूल्य असे अनुभव कथन लिहिले, आणि त्याद्वारे आयुष्याचे तात्पर्य उलगडले, ते तात्पर्य आणि साधे सुधे विचार हे, वाढते वैफल्य कमी करण्यास पसरवू का नये?
साहजिकच याच कारणामुळे अथवा विश्वासामुळे हिंदू धर्माला अनुसरून पण सर्व जगतात उपयोगास येईल असा भारतीय तत्वज्ञानाचा सर्वोच्च मानबिंदू म्हणजे भगवद्गीता जशी मला समजली तशी उदधृत करावी अशी इच्छा दृढ झाली. 'जशी मला समजली' असे म्हणण्याचे कारण म्हणजे इतक्या तत्ववेत्याना जसे आद्य शंकराचार्य, क्रांतिकारक - पुढारी लोकमान्य टिळक, ज्ञानेश्वर माउली यांपासून आत्तापर्यंतच्या हजारो ऋषितुल्य व्यक्तीना या ग्रंथाने भुरळ घातली आणि खरतर प्रत्येकाने या ग्रंथातून त्याना जसे मिळाले तसे घेतले, हेच होय. भगवद्गीतेवर टीका किंवा त्याचे विश्लेषण वगैरे करावे असा माझा हेतू नाही किंबहुना तेवढी माझी बुद्धीही नाही, पण जे मला उमगले, जेवढे मला मिळाले तेवढे तुम्हा पर्यंत कधी एकदा सोप्या शब्दात आणि फार पाल्हाळ न लावता, थर्ड पर्सन च्या भूमिकेतून आणि प्रभावी भाषेमध्ये पोहोचवतो असे झाले आहे.
उद्यापासूनच प्रकाशनमालेला सुरुवात करतोय. चुकूनही चूक भूल होणार नाही याची दक्षता मी घेत आहेच, पण अशी चूक आढळल्यास कृपया याची जाणीव अर्जुन.देशपांडे@जीमेल.कॉम या इ-पत्त्यावर करून द्यावी हि नम्र विनंती.
No comments:
Post a Comment