ध्यानयोग
कर्मयोग आणि सांख्ययोग (सविस्तर माहितीसाठी ही साखळी पहा) यांचे विवेचन केल्यानंतर श्री भगवंतानी योगाचे विवेचन करायला सुरुवात केली.
ध्यान कसं करावे याचा उपदेश करताना ते म्हणतात, " पवित्र, स्वच्छ अश्या ठिकाणी सुखासना मध्ये बसावे, आणि नाकाच्या शेंड्याकडे डोळे मिटून पहावे. एकाग्रता पाळून देहाने आणि मनाने ब्रह्मचर्येचे पालन करावे. या स्थिती मध्ये श्वासावर नियंत्रण असणे ही गरजेचे आहे. भगवंत पुढे असेही म्हणतात कि, "योग्य आहार, योग्य प्रमाणात असलेली विश्रांती, आणि योग्य ती जागरूकता याच्या द्वारे हा योगमार्ग सहज साध्य होतो. प्रतिदिनी अशी साधना करून त्यात भर घालत राहणे हेच योग मार्गाचे सार आहे."
अश्या साधनेमध्ये रममाण झालेला 'योगी' एखाद्या दीपाप्रमाणे शांतपणे तेवत राहत; प्रकाश देत राहतो. त्याला, दगड, माती, सोने चांदी सगळे सारखेच दिसू लागते - सगळे जगच त्याला समान भासू लागते. त्याला सगळीकडे माझेच रूप दिसते, खरतर ते त्याचे स्वत:चेच रूप असते कारण तो आणि मी वेगळा उरतच नाही.
हे ऐकल्यावर अर्जुनाला प्रश्न पडला कि मन शांत ठेवणे म्हणजे जणू वारा शांत ठेवणे. हे असे महा कठीण काम जमवायचे कसे? त्यावर भगवंत म्हणतात तुला सतत च्या प्रयत्नाने, अभ्यासाने, अनुभवाने आणि त्यामुळे प्राप्त झालेल्या वैराग्याने असे सगळे करता येईल.
यावर अर्जुन भगवंताना विचारतो - "एखादे वेळेस, एखादा योग मार्गाचा वाटसरू, जेव्हा त्याचा ताबा नं राहिल्याने रस्ता हरवतो, आणि योगसिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच मरण पावतो त्याचे काय होते? त्याला कुठे जागा मिळते? भगवंत त्यावर असे प्रतिपादन करतात की, "अश्या वेळेस अश्या योग्याला - योगाचे आचरण करण्याची संधी पुन्हा एकदा दिली जाते आणि त्यामुळे योगमार्गाची अर्धवट राहीलेली हि वाट्चाल तो पुन्हा सुरु करतो आणि शेवटी परमपदाला पोहोचतो.
अश्या रितीने कर्मवीर, ज्ञानी, तपस्वी होण्याबरोअबरच भगवंत अर्जुनाला 'योगी' होण्याची आज्ञा या ध्यानयोगामध्ये करतात.

dhyanyog.. chhan sangitlas..
ReplyDeleteखूपच सुंदर... उपयुक्त माहिती ....सध्या अशा योगाची खूपच गरज आहे कि जो सैरभैर अशा मनावर आवर घालील.
ReplyDeleteThank you very much - indradhanu ani Ashwin. :)
ReplyDelete