निष्काम कर्मयोग
स्थितप्रज्ञ मनुष्याचे लक्षण भगवंतानी अर्जुनाला सांगितल्यावर अर्जुनाला अजून एक प्रश्न पडला कि, 'भगवंतानी माझ्या सहचरांशी लढाई करण्याचे दुष्कृत्य करण्यासाठी मलाच का निवडले आहे?' मीच का? आपल्या मनातील ही शंका अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारली तेव्हा भगवंत म्हणाले कि, "काम अजिबात न केल्याने माणूस कर्महीन होतो असं नाही. हे जग चालतं ते प्रत्येक जण आपआपले कर्म करतो त्यामुळेच."
त्या नंतर स्वत:चे उदाहरण देताना भगवंत म्हणतात, "विश्वनियंता असलेला मी उद्या ठरवलं, कि मी काम करणार नाही, तर जगाचा काय विनाश होईल! मला या जगामध्ये मिळवण्यासारखे काहीच नाही तरीही साक्षात मी देखील कर्म करण्यावाचून कधी ढळत नाही."
भगवान पुढे म्हणतात की "श्रेष्ठ मनुष्याचे अनुकरण समाज करतो त्यामुळे स्वत: काही न करता लोकांना उपदेश करून त्याना फैलावर घेणे ही अयोग्यच आहे. गीतेमधला कर्मयोग म्हणजे तुम्ही स्वत: जे कार्य करत आहात ते तुमच्यासाठी त्या घडीला श्रेष्ट आहे या भावनेने आणि फलाची अपेक्षा न धरता करणे. भगवंत अर्जुनाला संबोधून म्हणतात की 'सत्याच्या रक्षणासाठी तसेच भल्यासाठी या रणांगणावर तू इथे दाखल झाला आहेस त्यामुळे युद्धाचे हे कर्म करण्यास तयार हो.'
(क्रमश:)
great.....
ReplyDelete