संपूर्णाचे ज्ञान
विश्वाची उत्पत्ती, रहस्य यांचा उलगडा करण्याची इच्छा बाळगणारे शास्त्र म्हणजे सांख्यशास्त्र. याच्या मुळाशी म्हणजे सांख्यापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे योग. या योगाचा उपदेश भगवंतानी अर्जुनाला केल्यावर ते पुढे अर्जुनाला सृष्टीचे विज्ञान तसेच परब्रह्माच्या ज्ञानाबद्दल सांगतात.
ते म्हणतात - "परब्रह्माचे रहस्य जाणून घेण्याकरता - म्हणजेच मला समजण्याकरीता तुला तुझं मन माझ्याकडे एकवटले पाहिजे. आता तुला देत असलेलं ज्ञान प्राप्त करण्यासाठी खूपच कमी लोक प्रयत्न करतात - आणि त्यातूनही एखादाच या ज्ञानापर्यंत पोहोचतो. तुला सांगत असलेले हे ज्ञान प्राप्त केल्यावर तुला अजून प्राप्त करण्यासारखे काहीच उरणार नाही."
भगवान पुढे म्हणतात, "पृथ्वी, अप, तेजो, वायू आणि आकाश हि पाच महाभुतं आहेत. मन, बुद्धी आणि अहंकार ही तीन तत्व अशी माझी जडप्रवृत्ती आहे, या सर्व विश्वामध्ये मी आहे - म्हणजेच हे विश्व मी धारण करणे अशी माझी चेतन प्रवृती आहे. या जगात, जे काही मंगल, पवित्र असं आहे हे माझेच गुण आहेत. भूत, वर्तमान, भविष्य यांचा स्वामी मीच आहे. सत्व, रज, तम हे माझेच गुण आहेत. तुला हे सर्व समजावून घेण्यासाठी मलाच शरण जावे लागेल."
भक्तांचे प्रकार समजावून सांगताना भगवंत म्हणतात, "चार प्रकारचे भक्त माझी उपासना करतात, संकटात सापडलेले ते आर्त, उपभोगाच्या सुखासाठी झटणारे अर्थार्थी, माझा स्वरूप जाणून घ्यायची इच्छा असणारे असे जिज्ञासू आणि माझ्या स्वरूपाचं ज्ञान होवूनही ज्यांचा आनंद लोप पावलेला नाही असे ते ज्ञानी भक्त. अर्थातच या चौघांपैकी ज्ञानी भक्त सर्वात श्रेष्ठ, कारण तो भक्ती साठी भक्ती करत असतो , त्याला त्यातून काहीच मिळणार नसतं. असे हे सर्व सृष्टीचे म्हणजेच परतत्वाचे ज्ञान मी तुला देतो आहे."

No comments:
Post a Comment