निष्काम कर्मयोग व ज्ञानयोग यांचा उपदेश ऐकून अर्जुनाने श्रीकृष्णाला शंका विचारली की कर्म आणि ज्ञान यामधील श्रेष्ठ कोण? या दोहोंपैकी कु
भगवान म्हणतात की, "कर्मयोगाची आणि ज्ञानयोगाची तुलना करत असता दोन्ही आचाराने हे परस्परविरुद्ध नाहीत. पण तरीही या मधले श्रेष्ठ हे निष्काम बुद्धीने केलेले कर्म हेच होय. कर्मा पासून संन्यास घेण्यापेक्षा हे कधीही उत्तमच. पूर्णत: कर्मसन्यास घेणे म्हणजे काहीच कर्म न करणे आणि त्या मार्गे परब्रह्म प्राप्त करणे महाकठीण आहे. पण . .
जो कोणाचा रागराग करत नाही, ज्याला कुठल्या अवाच्यासवा इच्छा धरून ठेवण्याची सवय नसते, तसेच ज्याला कुठल्याही उपभोगाच्या वासनांचा मोह होत नाही त्याला कर्मयोगी मानावा. असा कर्मवीर फार थोड्या वेळातच परमेश्वरास म्हणजे मला शोधतो. आपण जे काम करतो आहे, ती भगवंताची मर्जी आहे, आणि त्या होत असलेल्या कामाचे मिळणारे फळ आपण स्वत:चा अहंकार वगळून, त्याच ईश्वरास अर्पण करत आहोत अश्या मानसिकतेमध्ये केलेले कर्म कायम पुण्यच प्राप्त करून देते. चिखलात राहूनही चिखलाशी अलिप्तपणे राहणाऱ्या कमळासारखा तो मनुष्य पापमुक्त होतो."
थोडक्यात सांगायचे तर 'रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा' हा गीतेतील कर्मयोगाचा मनोभाव आहे.
तात्पर्य असे की दु:ख, सुख किंवा इतर सगळ्या भावना या प्रत्येक कर्माच्या वाट्यात असतातच. पण मिळालेल्या आनंदाचा, दु:खाचा तसेच इतर सगळ्या भावनांचा जो अतिरेक करत नाही आणि भगवंतावर श्रद्धा ठेवून आपलं काम करत असतो तोच मनुष्य या मुक्ततेचा अनुभव घेत असतो. म्हणजेच सुखाचा बोलबाला न करता आणि शोकाचा कडेलोट न करता भावनांना विवश करून त्याच्या अज्ञानाचा नाश हळू हळू होत जाते आणि त्याचे अंत:करण सूर्यासारखे तेजस्वी होत जाते.
(क्रमश:)
No comments:
Post a Comment